माय माझी माती

मायेची ममता जणू दुधवरची साय,
माय माझी माती माझी माती माझी माय
तुला कामाची गा दगदग
मागे वळून जरा बघ
मागे आहे तुझ बाळ
बांधली तुझ्याशी नाळ
पहाटे तू उठूनी
स्वयंपाक पाणी आवरोनी,
कचेरि जेव्हा निघती,
कंठ दाटूनी तो येती,
बाळ जेव्हा धडपडती
रडत तुला बीलगती,
तुझ्या कवेतच त्याला, औषध मलम मिळती,
तुझ्या कुशीची ग़ ऊब
आहे बहुतच खूब,
वर पदराची भर,
असे मायेची लहर,
कारण… माय माझी माती माझी माती माझी माय
जसे मांजरीचे दात
नाही पिलाला लागत,
तुझे फटके, नाही बसत चटके.
तुझे ओरडने, रागावणे,
असता पिलाच्या काळजीने
जरी दाखवला तू राग,
नसते त्यात काही आग.
पिल्ले होता मोठी,
आशीर्वाद तुझ्या ओठी,
म्हणे, घे तू उंच भरारी,
हीच माझ्या मनाची उभारी!
मग काय? पिल्ले उडूनी जाती,
वाट बघते ती माती,
आली परतोनि,
करी लाड आनंदानी!
कारण, माय माझी माती माझी माती माझी माय
माय माझी माती माझी माती माझी माय
अशी असते ही माता
हिची वेगळीच गाथा,
करी लाड पण खूप,
वर ओरडयाचे तूप!
तिच्या “गधदे”
मधे असतात धडे,
आणि एकाच “बाळा”
सामावितो आयुष्याचा सोहळा!
म्हणूनच मोठे झालो तरी,
दुख आले जरी,
म्हणतो आपण, “आई ग़!”
आणि आला क्षण आनंदाचा, मन मोकळेपणाचा,
मनी तुझीच माया, ओठांवर, “अय्या!”
कारण, माय माझी माती माझी माती माझी माय
माय माझी माती माझी माती माझी माय

Leave a comment